शिर्डी: साईनगर एक्स्प्रेसवर फिल्मी स्टाईलने दरोडा ८ लाखांची चोरी
शिर्डी: साईनगर एक्स्प्रेसवर फिल्मी स्टाईलने दरोडा ८ लाखांची चोरी
शिर्डी: शिर्डीहून काकिनाडा, आंध्रप्रदेश येथे जाणाऱ्या साईनगर एक्स्प्रेसवर गुरुवारी रात्री आठच्या सुमारास दरोडा पडला. मनमाड अंकाई दरम्यान सात ते आठ दरोडे खोरानी रेल्वेत घुसून प्रवाशांना मारझोड करत महिला प्रवाशांचे आठ लाखाचे दागिने लुटले. या मारहाणीत दोन महिला जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी औरंगाबाद रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
You May Also Like: Salman Khan upcoming movies 2018 and 2019
साईनगर एक्स्प्रेस मनमाडहून काकीनाकडे जाण्यास निघाली. मात्र अंकाई स्थानकादरम्यान साखळी ओढून रेल्वे थांबविण्यात आली. गाडी का थांबली हे पाहण्यासाठी रेल्वे कर्मचारी गाडीतून उतरले असता गाडीवर परिसरातून दगडफेक करण्यात आली. सात आठ जणांनी एक्स्प्रेस मध्ये घुसून वेगवेगळ्या बोगीतील प्रवाशांना मारहाण केली. महिलांना धमकावत आठ लाखाचे सोन्याचे दागिने लुटून जंगलात पलायन केले. यानंतर गाडी नगरसूल स्थानकावर थांबली असता संतप्त प्रवाशांनी स्थानकात निदर्शने करत पोलिसांना सुरक्षेबाबत जाब विचारला. या लुटीच्या घटनेत दोन महिला जखमी असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत. तर दरोडा प्रकरणी सात ते आठ अज्ञात विरोधात औरंगाबाद लोहमार्ग परिसरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरोड्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्धा उपस्थित होत आहे.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा