Home अहमदनगर अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी तीन जणावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी तीन जणावर गुन्हा दाखल

marrying a minor girl three-person crime filed

शेवगाव | Crime: अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी वडिलांच्या फिर्यादीनुसार मुलीची आई, आजी, मामासह बोधेगाव येथील नवरदेवावर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील हिंगेवाडी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी  आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह बोधेगाव येथील तरुणासाबोत १८ ऑगस्ट रोजी बोधेगाव येथील कुढेकर वस्तीवर होणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून १७ ऑगस्ट रोजी चाइल्डलाईन यांच्याकडे तक्रार करत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस व ग्रामविकास अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. २२ ऑगस्ट रोजी खात्री झाल्याने मुलीचे वडील यांच्या फिर्यादीनुसार त्याची पत्नी, मेव्हणा, सासू व नवरदेव रा. बोधेगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान मुलीचे आई वडील यांच्यात कौटुंबिक वाद असल्यामुळे विभक्त आहेत. या विवाहाची पत्रिका मोबाईलवर पाठविल्याने हा बालविवाह असल्याचे उघड झाले आहे.  

Web Title: marrying a minor girl three-person crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here