संगमनेर: अनैतिक संबंधातून अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म
Breaking News | Sangamner: घराजवळील मकाच्या शेतात बोलावून बळजबरीने मुलीवर अत्याचार.
संगमनेर: अनैतिक संबंधातून अल्पवयीन मुलीने गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना तालुक्यातील सावरगाव तळ परिसरात समोर आली असून याप्रकरणी पोलिसांनी एका जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुभाष मेंगाळ याने घराजवळील मकाच्या शेतात बोलावून बळजबरीने सदर मुलीवर अत्याचार केला. याबाबत पिडीत मुलीने मौन बाळगले. पिडीत मुलीला त्रास जाणवत होता. मात्र, कोणाला सांगायची हिम्मत झाली नाही. त्या दरम्यान पिडीत मुलीची तब्येत बिघडली त्यामुळे ती अनेक दिवस शाळेत गेली नाही. काल अचानक १ फेब्रुवारी २०२४ रोजी पिडीत मुलीचे पोट दुखू लागले. त्यामुळे, घरच्यांनी पिडीत मुलीला दवाखान्यात नेले. तेथे पिडीत मुलीची सोनोग्राफी केली. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, पिडीत मुलगी साडेआठ महिन्यांची गर्भवती आहे. वेळ कमी असल्यामुळे डॉक्टरांनी दाखल करून घेतले. त्यानंतर सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान तिने गोंडस मुलीस जन्म दिला आहे. हा सर्व प्रकार भयानक असला तरी पिडीतेस घडल्या प्रकाराची माहिती विचारली असता तिने सुभाष मेंगाळ याचे नाव सांगितले.
संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ परिसरात मागील वर्षी पिडीत मुलीच्या भावाला सुभाष मेंगाळ हा भेटायला येत होता. तेव्हा पिडीत मुलीची आणि सुभाष मेंगाळची ओळख झाली होती. एकेदिवशी सुभाष मेंगाळने प्रपोज करून आपण लग्न करू असे तिला म्हणाला. पिडीत मुलीने आई-वडिलांना विचारल्याशिवाय लग्न करणार नाही असे सांगितले.
याबाबत सदर अल्पवयीन मुलीने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुभाष दिलीप मेंगाळ (रा. सावरगावतळ, ता. संगमनेर) याच्याविरुद्ध बलात्कारासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ढुमणे करत आहे.
Web Title: minor girl gave birth to a child from an immoral relationship
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study