Home क्राईम चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भवती असल्याने उघडकीस

चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भवती असल्याने उघडकीस

Rape Case:  एका ६५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा धक्कादायक प्रकार मुलगी दोन महिन्याची गर्भवती राहिल्याने समोर आला आहे.

minor girl was Rape by luring her with chocolate

जालना : एका 65 वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्‍याची घटना जालना जिल्ह्यातल्या परतूर शहरात घडली आहे. सदर पिडीत अल्पवयीन मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्‍याची धक्‍कादायक बाब देखील समोर आल्याने उघडकीस आले आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

बशीर पाशा देशमुख नराधम आरोपीचे नाव आहे. शहरात एक अल्पवयीन मुलगी तिच्या वडिलांसोबत नेहमी मोंढ्यात जात होती. तिथे बशीर नावाच्या व्यक्तीने या अल्पवयीन मुलीला चॉकलेट देत मुलीशी जवळीक वाढवली.

शहरातीलच एका खोलीत त्या मुलीला चॉकलेट देण्याच्या आमिषाने घेवून गेला आणि त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला कुणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देत त्याने वारंवार तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे ही मुलगी दोन ते तीन महिन्यांची गरोदर झाल्याने ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पीडित मुलीने वडिलांसोबत परतूर पोलिसात धाव घेऊन या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान आरोपी नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: minor girl was Rape by luring her with chocolate

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here