Home महाराष्ट्र महेंद्रसिंह धोनीच्या आई वडिलांना कोरोनाची लागण

महेंद्रसिंह धोनीच्या आई वडिलांना कोरोनाची लागण

MS Dhoni parents infected with corona

रांची: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कप्तान महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni ) यांच्या आई वडील या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. महेंद्रसिंग धोनी हा आयपीएलमध्ये व्यस्त असताना आई वडील आजारी पडले आहे.

महेंद्रसिंह धोनीचे वडील पान सिंह धोनी आणि आई देवकी देवी या दोघांना रांची येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डॉक्टरच्या माहितीनुसार दोघांची प्रकृती स्थिर आहे. त्यांची ऑक्सिजन लेव्हलही सामान्य असल्याची माहिती देण्यात आली आहे. सीटी स्कॅन करण्यात आला आहे,  ज्यावरुन कळते की,  सध्या संक्रमण त्यांच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचलेले नाही. यामुळे जास्त त्रास होण्याचा धोका कमी आहे, यामुळे दोघांच्या प्रकृतीमध्ये लवकरच सुधारणा होईल.  त्यांचे अहवाल निगेटिव्ह येतील आणि त्यांना डिस्चार्ज मिळेल, अशी आशा व्यक्त केली जातेय.

Web Title: MS Dhoni parents infected with corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here