Home अहमदनगर Murder Case: भावाच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून

Murder Case: भावाच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून

Murder Case by strangling husband with the help of brother

कोपरगाव | Murder Case: पती हा पत्नीस दारू पिऊन त्रास देत असल्याने पत्नीने भावाच्या मदतीने शॉक देऊन व नंतर गळा आवळून खून केला. याप्रकरणी आरोपी पत्नी जयश्री व तिचा भाऊ भाऊ किरण ढोणे यांना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

पत्नी जयश्री व पती शिवनारायण नानाभाऊ संवत्सर यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून वाद होत होते. दारू पिऊन जयाश्रीस त्रास देत असल्याने तिने भावाच्या मदतीने पतीचा काटा काढायचा निर्णय घेतला. त्यासाठी ६ जून रोजी रात्रीच्या सुमारास आरोपीने वायरने शिवनारायण यास शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केला. परंतु तो न गेल्याने दोरीच्या सहायाने त्याला गळफास लावून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. ही बाब मृताच्या वडिलांनी जबाबात सांगितली आहे. अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत नागरे यांनी तपासाची चक्रे फिरविली. संशयित घेतलेले ताब्यात पत्नी व तिचा भाऊ ढोणे यांनी शिवनारायण यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Web Title: Murder Case by strangling husband with the help of brother

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here