Home अहमदनगर Murder: उधारीचे पैसे परत न केल्याने तरुणाचा खून

Murder: उधारीचे पैसे परत न केल्याने तरुणाचा खून

Murder of young man not return money

पाथर्डी | Murder: पाथर्डी तालुक्यातील लोहसर खांडगाव येथील ३७ वर्षीय तरुणाने दारूसाठी उधारीने घेतलेले पैसे परत दिले नाही या कारणातून तरुणाला लाथाबुक्क्यांनी, छातीत, पोटात मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे.

सुदाम विक्रम गीते वय ३७ रा. लोहसर खांडगाव यांनी दारू पिण्यासाठी उधार घेतलेले पैसे परत केले नाही. या कारणावरून आरोपी दत्तात्रय भाऊसाहेब वांडेकर, किरण सखाराम वांडेकर रा. लोहसर खांडगाव ता. पाथर्डी या दोघांनी सुदाम यास लाथाबुक्क्यांनी, छातीत, पोटात जबर मारहाण केल्याने सुदामचा मारहाणीत मृत्यू झाला.

मयत सुदामचा भाऊ आदिनाथ विक्रम गीते वय ४२ यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पाथर्डी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जावळे हे करीत आहे.    

Web Title: Murder of young man not return money

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here