Home अहमदनगर उद्यापासून येथे आहे लॉकडाऊन, आज दिसले भयानक चित्र

उद्यापासून येथे आहे लॉकडाऊन, आज दिसले भयानक चित्र

Nagar Lockdown is from tomorrow horriable picture

अहमदनगर | Nagar: नगर शहरात कोरोनाबाधित प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने आज मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन १० मे पर्यंत जाहीर करण्यात आला आहे. त्याअगोदर नगरच्या बाजारपेठेत धक्कादायक चित्र पाहायला मिळाले.

या लॉकडाऊन काळात आरोग्य विभाग (मेडिकल, दवाखाने) व सकाळी दुध विक्री सुरु राहणार असून बाकी सर्वच सेवा या बंद राहणार आहे. किराणा भाजीपाला सर्वच बंद राहणार आहे त्यामुळे रविवारी भाजी आणि किराणा खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली आहे, निर्बंधाचा फज्जा उडाला आहे. या गर्दीमुळे पोलीस यंत्रणादेखील हतबल झाली आहे. आजचा एकच दिवस तो पण ११ वाजेपर्यंत वेळ असल्याने भाजी बाजार व किराणा दुकानात तोबा गर्दी पाहायला मिळाली. यावेळी महापालिका पथके व पोलिसांनाही गर्दीला आवर घालता आला नाही.

Web Title: Nagar Lockdown is from tomorrow horriable picture

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here