Home अहमदनगर पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर रोहित पवारांनी व्यक्त केली वेगळीच भयानक शंका

पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर रोहित पवारांनी व्यक्त केली वेगळीच भयानक शंका

Bengal election results Rohit Pawar expressed different fears

अहमदनगर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्याने ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले व त्यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे.

दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल व डिझेलचे दर बऱ्याच काळ स्थिर होते पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरवाढ थांबविल्याची चर्चा होती. हा मुद्धा पकडून रोहित पवार यांनी एक ट्वीट केलं आहे. निवडणुका सम[संपल्याने आता पुन्हा दरवाढ सुरु होते की काय अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.

काही महिन्यापूर्वी पेट्रोल डीझेल दरवाढ एक मोठी समस्या बनली होती. कच्चा तेलाचे दर कमी असताना देखील दरवाढ होत असल्याचा आरोप विरोधकांनी केंद्रसरकारवर केला होता. आंदोलनही झाले. त्यांनतर पाच राज्याची निवडणुका कार्यक्रम जाहीर झाला. तेव्हापासून दरवाढ थांबली. या निवडणुका असल्यामुळे दरवाढ थांबली अशी चर्चा सुरु होती. आता या निवडणुकांच्या जय पराजय झाला. निकाल लागले. त्यामुळे आता पुन्हा दरवाढ होऊन महागाईच्या खाईत लोटतात की काय अस वाटू लागले आहे अस म्हणत पवार यांनी मुद्द्याकडे लक्ष वळविले.

Web Title: Bengal election results Rohit Pawar expressed different fears

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here