Home महाराष्ट्र पंढरपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयोग फसला

पंढरपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयोग फसला

Pandharpur Assembly election 2021 RESULT

पंढरपूर | Pandharpur Assembly Election 2021 RESULT: सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग पूर्णपणे फसला आहे. राष्ट्रवादीचा कार्यक्रम केला आहे. भाजपचे उमेदवार समाधान अवताडे हे ३७१६ मतांनी विजयी झाले आहेत तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला आहे. या पराभवाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक पार पडली. ही पोटनिवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपाने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या चुरशीच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट राज्याचे लक्ष लागून राहिले होते. यामध्ये भाजपाने मुसंडी मारली आहे. भाजपचे समाधान अवताडे हे ३७१६ मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या आमदार संख्येत आणखी एका आमदाराची भर पडली आहे.

Web Title: Pandharpur Assembly election 2021 RESULT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here