Home महाराष्ट्र डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकर्याला अटक- सीबीआयला पाच वर्षानंतर यश

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकर्याला अटक- सीबीआयला पाच वर्षानंतर यश

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकर्याला अटक- सीबीआयला पाच वर्षानंतर यश

मुंबई: अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणाऱ्या मारेकर्याला तब्बल पाच वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. सीबीआयने या प्रकरणी औरंगाबाद येथील एका तरुणाला जेरबंद केले असून त्याने हत्येची कबुली दिली आहे. सचिन अंदुरे असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान नालासोपारा स्फोटके प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शरद कळसकर यानेही तपासात दाभोलकर यांच्या हत्येत सहभागी असल्याची कबुली दिली आहे.

नालोसोपारा स्फोटके प्रकरणी वैभव राउत , शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या तिघांना अटक करण्यात आली. या तिघांची कसून चौकशी केली असता आरोपी शरद कळसकर याने औरंगाबाद येथील सचिन अंदुरे याचे नाव सांगितले होते. त्यामुळे सचिन याला चार दिवसापूर्वी औरंगपुरा भागातून ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीत त्याने नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. दरम्यान आरोपीची सीबीआय कसून चौकशी करत असून या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का? आणि कोणाच्या सांगण्यावरून हे सर्व केले याची लवकरच उलगडा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

You May Also LikeShraddha Kapoor Upcoming Movies 

डॉ. नरेंद्र दाभोलकर शनिवार पेठेत बालगंधर्व रंगमंदिराकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरून जात होते. अचानक २५ ते ३० वर्ष वयाचे दोन तरुण काळ्या स्प्लेंडर वरून आले होते. त्यांनी दाभोलकरांच्या मागून चार गोळ्या झाडल्या . त्यापैकी दोन गोळ्या दाभोलकरांच्या डोक्यात शिरल्या आणि ते खाली कोसळले. त्याचक्षणी दोघेही हल्लेखोर बाईकवर असून परागंदा झाले होते.

websites

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here