Home अकोले तालुकास्तरीय कुस्तीमध्ये सत्यनिकेतनचे यश

तालुकास्तरीय कुस्तीमध्ये सत्यनिकेतनचे यश

तालुकास्तरीय कुस्तीमध्ये सत्यनिकेतनचे यश

पिंपळगाव नाकविंदा / प्रतिनिधी – अॅड.एम.एन. देशमुख महाविद्यालय राजुर येथे नुकत्याच एकदिवसीय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा आनंदमय वातावरणात संपन्न झाल्या.
या स्पर्धात सत्यनिकेतन राजुर संस्थेतील सर्वोदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयांनी घवघवीत यश संपादन केले.
याप्रसंगी पंचायत समितीचे सदस्य दत्ता देशमुख यांनी या स्पर्धाचे उद्घाटन केले.
यावेळी संस्थेचे सहसचिव मिलिंद उमराणी, अहमदनगर कुस्ती संघाचे अध्यक्ष बबलु धुमाळ, अकोले क्रिडा संघटनेचे सचिव शिवाजी चौधरी, संचालक श्रीनिवास एलमामे, विजय पवार, विलास पाबळकर, उपप्राचार्य लहानू परबत आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धात गुरुवर्य रा.वी. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुर येथील १४ वर्ष वयोगटात मुलांमध्ये ४८ किलो वजन गटात तेजेस लोटे याने प्रथम क्रमांक तर मुलींमध्ये ४१ किलो वजन गटात फिरोदिया तांबोळी, ४८ किलो वजन गटात नंदिनी जगदाळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
१७ वर्षे वयोगटात मुलांमध्ये ४२ किलो वजन गटात विलास तारगे, ४४ किलो वजन गटात अनंत भांगरे, ५० किलो वजन गटात गोरक्ष मोहिते, ५४ किलो वजन गटात गणेश खाडे, ५८ किलो वजन गटात आकाश जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर मुलींमध्ये ४० किलो वजन गटात सलोनी बनसोडे, ४८ किलो वजन गटात प्रतिक्षा लहामगे, ४९ किलो वजन गटात दामिनी शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे १९ वर्षे वयोगटात मुलींमध्ये ४८ किलो वजन गटात संस्कृती हंगेकर, ५५ किलो वजन गटात दिपाली पवार, ७२ किलो वजन गटात वैष्णवी हेकरे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
तसेच सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे येथील १४ वर्षे वयोगटात अनामिका पराड हिने प्रथम क्रमांक मिळविला. तर १९ वर्षे वयोगटात ४० किलो वजन गटात अंकुश उघडे, ४५ किलो वजन गटात प्रेमराज झोले यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या सर्व खेळाडूंची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.
यावेळी साई कुस्ती केंद्राचे तान्हाजी नरके यांनी कोच म्हणून काम पाहिले.
या यशस्वी कुस्तीपटूंना क्रिडा शिक्षक प्रा.विकास नवले,प्रा.विनोद तारू, भाऊसाहेब बनकर, संपत धुमाळ, जालींदर आरोटे, भारत भोसले,प्रा.विक्रम आंबरे,प्रा. सचिन लगड यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख, सचिव टि.एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन, विश्वस्त प्रकाश शहा, सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य मनोहर लेंडे, अंतुराम सावंत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आदींनी अभिनंदन केले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व क्रिडा शिक्षकांनी परिश्रम घेतले.

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here