Home Accident News अहमदनगर: कार व रिक्षाच्या धडकेत एक जण ठार

अहमदनगर: कार व रिक्षाच्या धडकेत एक जण ठार

Nevasa Accident One killed in car-rickshaw collision  

Ahmednagar | Nevasa | नेवासे: नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा शिवारातील बाभूळवेढा फाट्याजवळ रिक्षाला कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ( Accident) रिक्षातील एक जण ठार तर तिघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

पुणे येथील मोहसीन मुमताजअली सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, शनिवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास आम्ही रिक्षाने नेवाशाकडे येत असताना माळीचिंचोरा शिवारात बाभूळवेढा फाट्याजवळील शनि मंदिरानजीक कारने धडक दिल्याने रिक्षातील असिफ अब्दुलरझाक शेख हे ठार झाले तर वहाब अब्दुल रझाक शेख, हैदर नूर शेख, मालिका अब्दुल रझाक शेख सर्व रा. कोंढवा हे जखमी झाले आहेत. या अपघातानंतर कार चालक फरार झाला आहे.

Web Title: Nevasa Accident One killed in car-rickshaw collision  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here