Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील या तीन पोलीस ठाण्याच्या इमारतीस मंजुरी

अहमदनगर जिल्ह्यातील या तीन पोलीस ठाण्याच्या इमारतीस मंजुरी

Approval for these three police station buildings in Ahmednagar 

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यातील राहुरी, पाथर्डी आणि नेवासे पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित पोलिसांच्या वसाहतीचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

वळसे पाटील यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात ई टपाल सेवेचे उद्घाटन पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. पोलिसांनी सर्वसामान्यांना न्याय मिळेल हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून काम करावे अशा सूचना गृह मंत्री वळसे पाटील यांनी दिल्या.

जिल्ह्यात सायबर गुन्हेगारी वाढली असून पोलिसांनी त्याकडे अधिक लक्ष केंद्रित करावे अशा सूचना दिल्या. अनेक दिवसांपासून राहुरी, पाथर्डी आणि नेवासे पोलीस ठाण्याच्या इमारतीचा प्रश्न प्रलंबित होता, त्याला मंजुरी दिली आहे. तसेच वसाहतीचा प्रश्न लवकरच सोडवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Web Title: Approval for these three police station buildings in Ahmednagar 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here