Home नेवासा गावठी कट्टा बाळगणाऱ्यास एकास अटक, गुन्हा दाखल

गावठी कट्टा बाळगणाऱ्यास एकास अटक, गुन्हा दाखल

Nevasa One arrested in village gang

नेवासा | Nevasa: नेवासा तालुक्यातील सलाबतपूर शिवारात राहणाऱ्या एकाला दोन गावठी कट्टे व ११ जिवंत काडतुसेसह नेवासा पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील एकास अटक केली आहे तर एक आरोपी पसार झाला आहे.

पोलीस नाईक राहुल यादव यांनी फिर्याद दिली आहे. विलास श्रीपत काळे वय ६५ रा. सलाबतपूर ता. नेवासा असे या अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर दुसरा पल्ल्या विलास काळे हा फरार झाला आहे.

पोलिसांना खबऱ्यामार्फत सलाबतपूर येथे काळे हा जिवंत काडतुसांसह गावठी कट्टे कमरेला लावून फिरत आहे अशी माहिती मिळाली. यानुसार नेवासा पोलिसांनी सलाबतपूर शिवारातील दिघी चौकाजवळ सापळा रचून विलास काळे याला पकडले. यावेळी त्याच्या कमरेला एक व खिशात एक असे प्रत्येकी ४० हजार रुपयांचे दोन गावठी कट्टे साडे पाच हजाराचे ११ काडतुसे असा एकूण ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्याची कसून चौकशी केली असता त्याला हे कट्टे त्याचा मुलगा पल्ल्या याने दिल्याचे सांगितले.    

Web Title:  Nevasa One arrested in village gang

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here