Home अहमदनगर Ahmednagar: जिल्ह्यात बाजारपेठ, दुकाने सुरु राहण्यासंदर्भात नवीन नियम

Ahmednagar: जिल्ह्यात बाजारपेठ, दुकाने सुरु राहण्यासंदर्भात नवीन नियम

New rules regarding the opening of markets and shops in Ahmednagar

अहमदनगर | Ahmednagar: लॉकडाऊन आदेशाची मुदत संपल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नवीन नियम लागू केले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात अनलॉक ४ चे नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, दुकाने हे सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अगोदर दुकाने पाच वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुदत होती, मात्र ती आता वाढवून सायंकाळी सात पर्यंत करण्यात आली आहे.

अवघ्या दोन तासांची मुदत वाढविल्याने व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला आहे. तसेच सर्व कोविड १९ नियमांचे पालन करण्याचे या आदेशात म्हंटले आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंदच राहणार आहेत. पाच पेक्षा जास्त व्यक्तीने एकत्र राहणे, दुचाकीवर दोन पेक्षा अधिक व्यक्तींना बसता येणार नाही. लॉकडाऊनचे सर्व नियम व जमावबंदीचे सर्व नियम कायम ठेवण्यात आले आहेत. मंगलकार्यालयातील विवाह समारंभास ५० पेक्षा जास्त जणांना प्रवेश नाही, तसेच अंत्यविधीला २० जणांना प्रवेश देण्यात आला आहे.

Web Title: New rules regarding the opening of markets and shops in Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here