Home राहाता दरोड्याच्या तयारीत असलेले आरोपी पिस्तुल सह पकडले

दरोड्याच्या तयारीत असलेले आरोपी पिस्तुल सह पकडले

शिर्डी:  शिर्डी परिसरात रात्रीच्या वेळी आजूबाजूंच्या रस्त्यांवर येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरू व वाहनांना अडवून त्यांना पिस्तुल व चाकूचा धाक दाखवून दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना शिर्डी पोलिसांनी गुप्त खबरीवरून देशी बनावटीच्या पिस्तुलसह धारदार चाकू जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त खबर्याकडून गंभीर गुन्ह्यातील सुटलेले आरोपी शिर्डीतील हॉटेल साईसीमा येथील तिसऱ्या मजल्यावर एका खोलीत आले असल्याची माहिती मिळाली त्यावरून शिर्डी पोलिसांनी छापा टाकून तिघांना पकडले आहे. यातील एक अल्पवयीन व अन्य एक असे दोघे फरार आहेत. आरोपींकडून ३५ हजार रुपयांची पिस्तुले जप्त करण्यात आली आहे. गोकुळदास पळसे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अमोल लक्ष्मण पोरे वय ३० रा. येवला रोड कोपरगाव, सोमनाथ तुकाराम गायकवाड वय २३ रा. रामवाडी ता. कोपरगाव, सुनील शिवाजी दर्शिंग वय २७ रा. भगूर ता. वैजापूर यांच्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोडा करण्याच्या आधीच आरोपी पकडले गेले आहे.

Website Title: News accused, who was preparing for the robbery

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here