Home अकोले सर्वोदय विद्यालय, राजुर येथे नेक्स्ट एज्युकेशन कंपनीकडून स्मार्ट क्लासरूम प्रझेंटेशन उपक्रम

सर्वोदय विद्यालय, राजुर येथे नेक्स्ट एज्युकेशन कंपनीकडून स्मार्ट क्लासरूम प्रझेंटेशन उपक्रम

राजूर(News): अकोले तालुक्यातील सत्यनिकेतन संस्थेच्या गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुर येथे नेक्स्ट एज्युकेशन कंपनीकडून डेमो प्रझेंटेशन उपक्रम सादर करण्यात आला.

येथील सत्यानिकेतन संस्था व  उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा.दिपक बुऱ्हाडे यांच्या अथक प्रयत्नातुन राजुर सारख्या आदिवासी विभागातील शाळेंमध्ये नेक्स्ट एज्युकेशन या माहीती तंत्रज्ञान कंपनी तर्फे डेमो सेटअप उभारण्यात आला असुन पुढील तिन महिन्यासाठी तालुक्यातील प्रत्येक शाळांना आमंत्रीत करून या डेमोचे सादरीकरण करण्यात येणार आहे. हि संकल्पना एक स्मार्ट क्लासरूम असुन बदलत्या शैक्षणिक अहवानाना  यशस्वीरीत्या सामोरे जाण्यासाठी शिक्षक व विदयार्थी यांच्यासाठी निश्चितच फलदायी ठरणार आहे. येणाऱ्या काळामध्ये सत्यनिकेतन संस्था अंतर्गत असणाऱ्या शाळांच्या सर्व वर्गखोल्या या स्मार्ट क्लासरूम करण्याचा संस्थेचा संकल्प आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शाळांना स्मार्ट डिजिटल क्लासरूम करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. तरी या विद्यालयाशी संपर्क साधून स्मार्ट डिजिटल क्लासरूम डेमो सेटअपचा अनुभव घेण्याकरिता उपप्राचार्य लहानू पर्बत यांनी आवाहन केले आहे.

या उद्घाटनप्रसंगी नेक्स्ट एज्युकेशन या कंपनीचे जनरल मॅनेजर जया सहा, सिनिअर मॅनेजर हेमा रानी स्वतः उपस्थित होत्या. त्याचबरोबर नवी दिल्ली येथील रमेश प्रनेश, हैद्राबाद येथील यु.एम. पोथानी प्रसाद हे देखील आवर्जुन उपस्थित होते.कंपणीचे तज्ञ मार्गदर्शक अभिज्ञान नरवारीया यांनी उपस्थित शिक्षकांना सखोल प्रशिक्षण दिले. यावेळी सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टि.एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, माजी प्राचार्य तथा संचालक प्रकाश टाकळकर, नंदकिशोर बेल्हेकर, विभागीय अधिकारी प्रकाश महाले, प्राचार्य मनोहर लेंडे, माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख अजित गुंजाळ, संस्थेचे सर्व पदाधीकारी यांसह संस्थेच्या अंतर्गत असलेल्या राजुर, खिरविरे, शेणित, कातळापुर या शाळांमधील शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच सुत्रसंचालन प्रा. दिपक बुऱ्हाडे यांनी केले. तर डि.बी.पगारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Website Title: News Rajur Smart Classroom Presentation Program

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here