Home अकोले अकोले: १४ लाख विठ्ठल नामाचा जप वहीमध्ये लिखित

अकोले: १४ लाख विठ्ठल नामाचा जप वहीमध्ये लिखित

अकोले: १४ लाख विठ्ठल नामाचा जप वही मध्ये लिहून केले बद्दल वारकरी संप्रदायाचे वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांचा सत्कार करण्यात आला.
अकोले येथे जोग महाराज यांचे पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. प पु सुभाष पुरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांचा प्रतिमेची पूजा विश्वास आरोटे यांचे हस्ते करण्यात आली. यावेळी तुकाराम बुवा आरोटे, विवेक महाराज केदार, शांताराम पापळ, अशोक देशमुख, आदि उपस्थित होते.
अखंड हरिनाम सप्ताह च्या निमित्ताने विठ्ठल विठ्ठल नामचा जप व्हावा याहेतूने वही मध्ये विठ्ठल नाव लिहून एक कोटी जप करण्याचा संकल्प जोग महाराज पुण्यतिथी निमित्ताने करण्यात आला होता त्यात चौदा वहीमध्ये एक लाख याप्रमाणे चौदा लाख जप विश्वास आरोटे, परिघा आरोटे, विजय सहाणे, सुनील शेळके, सोनेरी आरोटे, छत्रपती आरोटे यांनी याकामी मदत केली.
Website Title: News Vitthal name chanting book

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here