Home अकोले निळवंडे धरण भरले तर मुळा धरणातील पाणीसाठा…..

निळवंडे धरण भरले तर मुळा धरणातील पाणीसाठा…..

Nilwande Dam:  धरणातील पाणीसाठा 8271 दलघफू (99.31टक्के) झाला. या धरणातून 1600 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर 26000 दलघफू क्षमतेच्या धरणातील पाणीसाठाही 90 टक्क्यांवर.

Nilwande dam is full, the water storage in the Mula dam

अकोले:  निळवंडे धरण भरले आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 8271 दलघफू (99.31टक्के) झाला. या धरणातून 1600 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर 26000 दलघफू क्षमतेच्या धरणातील पाणीसाठाही 90 टक्क्यांवर जाणार आहे. त्यामुळे पाणलोटासह लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.

पाणलोटात अधूनमधून सरी कोसळत असल्याने भंडारदरात नव्याने पाणी दाखल होत आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 98 दलघफू पाणी दाखल झाले. हे सर्व पाणी निळवंडे सोडण्यात आले. वाकी तलावाचाही विसर्ग 197 क्युसेकने सुरू आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत पाणलोटात झालेला पाऊस मिमीमध्ये-भंडारदरा 43, घाटघर 58, पांजरे 37, रतनवाडी 67, वाकी 23.

मुळा पाणलोटातही अधूनमधून सरी कोसळत असल्याने धरणात धिम्या गतीने पाण्याची आवक होत आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 22806 दलघफू (87.71 टक्के) झाला होता. सायंकाळी यात वाढ होवून तो 22940 दलघफू झाला होता. कोतूळ येथील मुळेचा विसर्ग 1393 क्युसेक आहे. हा साठा आज रविवारी 23000 दलघफूच्या पुढे जाणार आहे. या लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Nilwande dam is full, the water storage in the Mula dam

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here