Ahmednagar News: मैत्रिणीच्या ओळखीच्या तरुणाबरोबर मैत्री केलेल्या अल्पवयीन मुलीवर त्याच तरुणाने वेळोवेळी बदनामी करण्याची धमकी देत अत्याचार (Rape) केल्याचा प्रकार.
अहमदनगर: मैत्रिणीच्या ओळखीच्या तरुणाबरोबर मैत्री केलेल्या अल्पवयीन मुलीवर त्याच तरुणाने वेळोवेळी बदनामी करण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा प्रकार नगर शहरात घडला आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने बुधवारी (दि. 21) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ देविदास तांभोरे (रा. शेवगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अल्पवयीन मुलगी शेवगाव तालुक्यातील एका हायस्कूल मध्ये शिक्षण घेत असताना तिची एका मुलीसोबत मैत्री झाली होती. त्या मैत्रिणीने मार्च 2023 मध्ये तिच्या ओळखीचा सोमनाथ तांभोरे याला फिर्यादीचा मोबाईल नंबर दिला होता व त्याच्या सोबत मैत्री करण्यास सांगितले होते. फिर्यादीने सोमनाथ सोबत मैत्री केली. मागील दोन महिन्यांपूर्वी फिर्यादी नगर शहरातील शिक्षण घेत असलेल्या कॉलेजमध्ये असताना सोमनाथ दुचाकी घेऊन तेथे आला.
त्याने फिर्यादीला त्याच्या दुचाकीवर बसवून फिरायला जायचे असे सांगून दौंड रस्त्यावरील एका लॉजवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगू नको, नाही तर तुझी बदनामी करून तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली. दरम्यान, सोमनाथ याने पीडित फिर्यादी मुलीवर 4 जुलै 2023 रोजीही दौंड रस्त्यावरील एका लॉजवर घेऊन जात पुन्हा अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Web Title: on friendship, rape minor girl by taking her to lodge
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App