Home Accident News संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर ट्रॅव्हल व दुचाकीच्या अपघातात एक ठार

संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर ट्रॅव्हल व दुचाकीच्या अपघातात एक ठार

Ahmednagar Sangamner Accident: ट्रॅव्हल व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार.

One killed in travel and two-wheeler accident on Pune-Nashik highway

संगमनेर: ट्रॅव्हल व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आळेफाटा परिसरातील कणसे कॉलेज जवळ हा अपघात गुरुवारी (दि. २९) दुपारी एकच्या सुमारास घडला. भाऊसाहेब पांडुरंग बीडकर (४०, रा. मांडवे बुद्रुक, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भाऊसाहेब बीडकर हे दुचाकी (एम.एच. १७ सी.एफ. ३९७२) वरून नाशिक पुणे महामार्गाने आळेफाट्याकडे जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ओम शांती ट्रॅव्हलने (आर.जे. ०९ पी.ए. ५०६९) दुचाकीला जोराची धडक दिली. बीडकर यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आळेफाटा पोलिसांनी ट्रॅव्हलचालक पारसमल खटीक (रा. गिलुंड, ता. चित्तोडगड, राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल विनोद गायकवाड करीत आहेत.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

Web Title: One killed in travel and two-wheeler accident on Pune-Nashik highway

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here