Home अहमदनगर कंपनीने केली शेतकऱ्यांची थट्टा! विम्यासाठी भरले ८० रुपये अन भरपाई मिळाली ५...

कंपनीने केली शेतकऱ्यांची थट्टा! विम्यासाठी भरले ८० रुपये अन भरपाई मिळाली ५ रुपये

Ahmednagar: कंपनीने केली शेतकऱ्यांची थट्टा! विम्यासाठी (insurance)भरले ८० रुपये अन भरपाई मिळाली ५ रुपये, शेतकरी न्यायालयात जाण्याच्या तयारीत.

Paid Rs 80 for insurance and received compensation Rs 5

अस्तगाव (जि. अहमदनगर) : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत राहाता तालुक्यातील केलवड येथील बाबूराव सावळेराम गर्म या शेतकऱ्याला एका गुंठ्यामागे ५.३८ रुपयाने रक्कम खात्यात जमा झाली.

विमा काढताना कंपनीने शेतकरी व केंद्र तसेच राज्य सरकारकडून ८० रुपये १६ पैसे गुंठ्याने रक्कम जमा केली. असाच प्रकार अनेकांच्या बाबतीत घडला. सोयाबीन पिकाचे १०० टक्के नुकसान झाले कंपनीने शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे.

अनेक गावांत शेतकऱ्यांकडून विमा कंपनीने प्रतिगुंठा ५, ३८, ४३, ५६, ७०, ९०, १०० ते १३० अशी सरासरी रक्कम जमा केली. अतिपावसाने पिकांचे १०० टक्के नुकसान झाले असताना केवळ नगण्य रक्कम का दिली, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

मदतीची अपेक्षा, परंतु भ्रमनिरास

एका गुंठ्यामागे शेतकऱ्यांकडून ११ रु. ४५ पैसे व सरकारकडून ६८ रु. ७१ पैसे भरलेले असतात. केलवडचे शेतकरी बाबूराव सावळेराम गमे यांनी २ हेक्टर ६१ आरवर विमा उतरविला होता, १०० टक्के नुकसान होऊनही त्यांना फक्त १,४०६रु. खात्यात वर्ग केल्यामुळे शेतकरी न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. 

Web Title: Paid Rs 80 for insurance and received compensation Rs 5

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here