Home महाराष्ट्र ब्रेकिंग: नाशिक-पुणे रस्त्यावर शिवशाही बस पेटली, जळून खाक

ब्रेकिंग: नाशिक-पुणे रस्त्यावर शिवशाही बस पेटली, जळून खाक

ShivShahi Bus Fire: आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात.

Shivshahi bus caught fire on Nashik-Pune road

सिन्नर : नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणारी राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस सकाळी आठ वाजेच्या सुमारास सिन्नर जवळील माळवाडी (शिवाजीनगर) शिवारात जळून खाक झाली.

नाशिक येथून सकाळी सात वाजेच्या सुमारास प्रवासी घेऊन शिवशाही बस पुण्याच्या दिशेने निघाली होती. सिन्नर येथे थांबल्यानंतर ती पुढे संगमनेरच्या दिशेने मार्गस्थ झाली. तथापि, माळवाडी (शिवाजीनगर) शिवारात अचानक बसमधून धूर निघू लागल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि सर्व प्रवासी बस खाली उतरले.

क्षणार्धात बस पेटली. बसमधून आगेच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावले. सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्व प्रवासी सुखरूप असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. तथापि, बस जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान कालही येरवाडा येथे शिवशाही बसने पेट घेतला होता. शिवशाही बस गरम होत असल्याने अशा दुर्घटना होत आहेत. यामुळे प्रवाशी चिंता व्यक्त करीत आहे.

Web Title: Shivshahi bus caught fire on Nashik-Pune road

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here