Home अहमदनगर जबरी चोरी, सहा तोळे सोन्याचे दागिने लंपास  

जबरी चोरी, सहा तोळे सोन्याचे दागिने लंपास  

Parner Robbery, six weights of gold jewelry Theft

पारनेर | Parner Theft: पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील अशोक सिताराम सालके यांच्या घराच्या आतील दरवाजाचा कोंडा तोडून घरात घुसलेल्या चोरट्यांनी सहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अशोक सालके, त्यांची पत्नी सून व मुलगा रात्री बारा वाजेच्या सुमारास झोपले. रात्री पाऊस सुरु असल्यामुळे झोपण्यास नेहमीपेक्षा विलंब झाला होता. एक वाजण्याच्या सुमारास गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी कटावणीच्या मदतीने घराच्या दाराचा आतील कोंडा तोडला. घरात प्रवेश करून कपाटातील काही पिशव्या त्यांनी घेतल्या. चोरी केल्यानंतर पाठलाग करू नये यासाठी बाहेरील दिवा बंद व दुचाकीचा प्लग काढून घेण्यात आला होता. चोरी करून फरार होताना एकाची चप्पल घटनास्थळी आढळून आली. घरातील सामान बाहेर आणून उचकापाचक करीत त्यातील सहा तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले.

सकाळी उठल्यानंतर घरातील समान असताव्यस्त आढळून आल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Parner Robbery, six weights of gold jewelry Theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here