Home Accident News विजेच्या धक्क्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Pathardi Accident 13-year-old boy dies of electric shock

पाथर्डी | Pathardi News | Ahmednagar Accident: पाथर्डी तालुक्यातील मुंगुसवाडे येथील १३ वर्षीय मुलाचा शेतात काम करीत असताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राम नारायण हिंगे वय १३ रा. मुंगुसवाडे ता. पाथर्डी असे या मयत मुलाचे नाव आहे. राम हिंगे हा आठवी इयत्तेत शिकत होता.

राम हा शेतामध्ये काम करण्यासाठी गेला होता. तेथेच त्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी मुलाची आई व बहिण विहिरीत बुडून मृत्यू झाला होता. पिण्यासाठी विहिरीतून पाणी बाहेर काढत असताना बहिण पाय घसरून विहिरीत पडली होती. तिला वाचविण्यासाठी आईने विहिरीत उडी मारल्याने माय लेकीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Pathardi Accident 13-year-old boy dies of electric shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here