Home अहमदनगर घराच्या अंगणातून बिबट्याने चिमुरडीला उचलून केले भक्ष्य

घराच्या अंगणातून बिबट्याने चिमुरडीला उचलून केले भक्ष्य

Pathardi leopard picked up Chimurdi from the yard

पाथर्डी | Pathardi: पाथर्डी तालुक्याच्या मढी गावावाजवळ आमदरा वस्तीवर चिमुरडी अंगणात आजी सोबत जेवण करीत असताना बिबट्याने अचानक हल्ला करत चिमुरडीला उचलून नेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील मढीगावाजवळ आमदरा वस्तीवर रात्री ८ वाजेच्या सुमारस घरासमोर श्रेया सुरज साळवे वय ३ ही बालिका आजी आजोबा सोबत जेवण करीत होती. तिथे अचानक बिबट्या आला आणि काही क्षणातच श्रेयावर हल्ला करत तिला उचलून घेऊन पळून गेला. आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिक धावून आले. वन विभागाचे कर्मचारीसुद्धा आले. परिसरात शोधाशोध केली. मात्र रात्र असल्याने काही मिळून आले नाही. दुसऱ्या दिवशी घराच्या एक किलोमीटर अंतरावर चिमुरडीचा अर्धवट मृतदेह आढळून आला.

दरम्यान या घटनेपूर्वी शेजारील वस्तीवर बिबट्या येऊन गेला होता. त्यांनतर तोच बिबट्या या वस्तीवर येऊन चिमुरडीवर हल्ला केला असावा असा संशय व्यक्त होत आहे.

वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Pathardi leopard picked up Chimurdi from the yard

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here