संगमनेर: नाशिक पुणे हायवेवर टेम्पो व तेलाच्या टँकरची धडक, तेल गेले वाया
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील एकल घाटात नाशिक पुणे महामार्गावर तेलाच्या टँकरला आयशर टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात दोनही वाहनांचे नुकसान झाले आहे. यात टेम्पोचा क्लीनर जखमी झाला आहे. टँकरमधील तेल रस्त्यावर सांडले आहे.
या महामार्गावर धुळे वरून तेल वाहणारा टँकर क्रमांक एम.एच.४६ एएफ. ४४२३ हा संगमनेर मार्गे पुण्याकडे चालला होता. टँकर एकल घाटात आला असता त्याच्या पाठीमागून भरधाव वेगात येणारा आयशर टेम्पो तेलाच्या टँकरला येऊन जोरात आदळला. टेम्पोचा पुढचा बाग दबला तसेच टेम्पोचा क्लीनर गंभीर जखमी झाला. टँकरला चिरा पडल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात तेल वाहू लागले, या अपघाताचा आवाज ऐकून जाणाऱ्या वाहन चालकांनी आपली वाहने थांबवून क्लिनरला बाहेर काढण्यास मदत केली. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस मदत केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहायाने वाहने बाजूला घेण्यात आली. तेल गळती मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर झाली होती.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Sangamner Nasik Pune highway tempo tanker Accident