Home अहमदनगर बंधाऱ्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू

बंधाऱ्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pathardi Two youths drown in dam

पाथर्डी | Pathardi : अंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील देवराई गावाजवळील बंधाऱ्यात घडली. यावेळी एक जण सुदैवाने वाचला आहे.   

याबबत अधिक माहिती अशी की, करंजी येथे मिठाईचा व्यवसाय करण्यासाठी राजस्थान येथून काही कुटुंब स्थाईक झालेले आहेत.

यामधील प्रणव पांडुरंग कुचेकर वय १७ रा. बीड, मनेष देवराबी भाभी बिष्णोई रा. जोधपुर राजस्थान व ;लादुराव जगन्नाथ पालेवाल रा. जोधपुर राजस्थान हे तिघे तरुण देवराई येथील बंधाऱ्यात अंघोळ करण्यासाठी गेले होते. बंधाऱ्याचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे यामधील प्रणव व मनेष या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यातील लादुराम हा वाचला. त्याने महामार्गावर उभे राहून आरडाओरडा करत मदत मागितली. आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी जाऊन तरुणांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह श्वाविचेदन करण्यासाठी पाथर्डी येथे नेण्यात आले. या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Pathardi Two youths drown in dam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here