Home अकोले अकोले शहरातील अदिवासी मुलांचे वसतिगृह परिसरात वृक्षारोपण

अकोले शहरातील अदिवासी मुलांचे वसतिगृह परिसरात वृक्षारोपण

अकोले: स्टेट बँकेच्या स्थापनादिनानिमित्त अकोले येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. अकोले शाखेचे मुख्य व्यवस्थापक सतीश गोंदके, वसतिगृहाचे गृहपाल सुरेश राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. १ जुलै हा बॅँकेचा स्थापना दिवस असल्याने संपूर्ण भारतभर तो उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

अकोले येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह (खानापूर) अकोले या वस्तीगृहाच्या परिसरात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कडुनिंब, पिंपळ, सीताफळ, शेवगा, जांभूळ इत्यादी प्रकारची झाडे कर्मचाऱ्यांनी स्वत: आणून वसतिगृह विद्यार्थ्यांसमवेत वृक्षारोपण करून बँक स्थापना दिवस साजरा केला..

तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवस्थापक सतीश गोंदके यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी सतत प्रयत्नशील राहा. अभ्यासू व कष्टाळू बना, असे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बँकेचे व्यवस्थापक सतीश गोंदके, कृ षी अधिकारी वैभव कदम, कर्ज अधिकारी निखिल जांभुळकर, कृ षी सहाय्यक कुणाल नेरकर,इतर कर्मचारी,वसतिगृहाचे गृहपाल सुरेश राठोड व त्यांचे सहकारी अनिल जोशी, दत्ता गायकवाड, विकास पवार यांच्यासह पालक व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.

Website Title: Plantation In The Hostels Area Of ​​Adivasi Children In Akole City

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here