Home अहमदनगर अहमदनगर: पोलिसाने विष घेऊन केली आत्महत्या

अहमदनगर: पोलिसाने विष घेऊन केली आत्महत्या

Police commit suicide by taking poison

अहमदनगर  | Ahmednagar: विषारी पदार्थ घेऊन एका पोलीस अंमलदाराने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे.  सोमनाथ बापू कांबळे (रा. विळद ता. नगर) असे मयत पोलीस अंमलदाराचे नाव आहे. ते पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात नेमणुकीस होते. त्यांनी विषारी पदार्थ कोणत्या कारणातून घेतला, याची माहिती अद्याप समोर आली नसून या घटनेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नगर तालुक्यातील इमामपूर शिवारात कांबळे यांनी तीन दिवसांपूर्वी विषारी पदार्थ घेतला होता. त्यांना उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. गुरूवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कांबळे हे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात नेमणुकीस होते. त्यांनी अनेक हरवलेल्या मुले-मुली, महिला-पुरूष यांचा शोध घेण्याचे काम केले आहे. त्यांनी कोणत्या कारणातून विष घेतले याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलीस अंमलदाराने आत्महत्या केल्याने जिल्हा पोलीस दलात पसरल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Police commit suicide by taking poison

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here