सिंघम म्हणत पोलिसानं स्वतःवर झाडली गोळी, श्रद्धांजलीही वाहिली
Solapur: पोलिसाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न.
सोलापूर: एका पोलिसाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तो इतक्यावरच थांबला नाही तर सोशल मीडियावर स्वतःला सिंघम म्हणत भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे. या घटनेनंतर सोलापूर पोलिस विभागात खळबळ माजली आहे.
विकास गंगाराम कोळपे असे स्वत:वर गोळी झाडणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून त्याने टोकाचं पाऊल उचलले आहे. त्याला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोलापुरात कारागृहात नियुक्त असलेल्या विकास गंगाराम कोळपे या पोलिस शिपायाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. 34 वर्षीय विकास गंगाराम कोळपे यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. कर्तव्यावर हजर असताना संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास जवळ असलेल्या रायफलने कोळपे यांनी स्वतःवर गोळी झाडली. तो इतक्याचवर थांबला नाही तर सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. स्वतःला सिंघम म्हणत त्याने भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे. विकास गंगाराम कोळपे यांना उपचारासाठी गंभीर जखमी अवस्थेत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अतिशय गंभीर असल्यामुळे त्यांना आता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेने सोलापूर पोलिसांमध्ये एकच खळबळ माजली आहे.
ठाण्यातून धक्कादायक घटना: भररस्त्यात तलवारीने वार करून हत्या झाल्याची घटना
ठाण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यात एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भररस्त्यात तलवारीने वार करून हत्या झाल्याची घटना घडली आहे. सतीश पाटील असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस स्थानकात गुन्हा नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.
Web Title: policeman attempted suicide by shooting himself
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App