Home महाराष्ट्र पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

proposal for Pune Nashik Semi High-Speed ​​Railway Project

मुंबई: राज्यातील रेल्वे मार्गाच्या कामांना गती देणे आवश्यक आहे. विशेषतः राज्याच्या अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पासंदर्भात महारेल यांनी आराखडा तयार केला आहे. त्यातील पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

सहयाद्री अतिथीगृह येथे पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, मुख्य सचिव संजय कुमार व आदी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

पुणे आणि नाशिक दोन्ही जिल्हे कृषी क्षेत्रात आणि औद्योगिक क्षेत्रात समृद्ध जिल्हे आहेत. हा रेल्वे मार्ग पुणे आणि नाशिक येथील औद्योगीक क्षेत्र व तीर्थक्षेत्रांना जोडणारा आहे. भाविकांना शिर्डीला जाणे सोयीचे होईल. हा रेल्वे मार्ग विकसित झाल्यास या भागातील आर्थिक विकास अधिक गतिमान होऊन महसूल वाढ तसेच कृषी, उद्योग पर्यटन वाढीस, वाहतूक व निर्यातीस मोठी चालना मिळेल. रोजगार वाढेल अशी माहिती यावेळी देण्यात आली.

एमआरआयडीसीमार्फत भविष्यात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचे महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैस्वाल यांनी बैठकीत सादरीकरण केले.   

Web Title: proposal for Pune Nashik Semi High-Speed ​​Railway Project Uddhav Thackeray

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here