Home अहमदनगर त्या आरोपीने न्यायालयात जात असताना वाहनाखाली उडी मारून दिला जीव

त्या आरोपीने न्यायालयात जात असताना वाहनाखाली उडी मारून दिला जीव

Rahata news accused jumped under the vehicle while going to the court

राहता | Rahata News: पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीने न्यायालयात नेत असताना अवजड वाहनाखाली उडी मारत जीव दिल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये आरोपीचा गाडीच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला आहे. जनार्दन चंद्रयया बंडीवार वय ४६ रा. राहता असे या मयत आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, राहता शहरातील जनार्दन बंडीवार यास दोन दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोपरगाव विभागीय अधिकाऱ्यांनी अटक केली होती. बनावट ताडी बनवून विक्री करत असल्याच्या आरोपावरून कारवाई कारवाई करण्यात आली होती. त्यास न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्याने मंगळवारी जनार्दन व त्याच्यासोबत दुसरा आरोपी अखिल शेख यास न्यायालयात नेले जात होते. यावेळी दोघा आरोपींना लघुशंका करण्यासाठी बाभळेश्वर येथील बस स्थानकातील शौचालायाकडे घेऊन जात असताना जनार्दन याने बाभळेश्वर चौकातून जाणाऱ्या अवजड माल वाहतूक गाडीच्या मागील चाकाखाली अचानक उडी घेतली. त्यामध्ये त्याचा चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. याप्रकरणी लोणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Rahata news accused jumped under the vehicle while going to the court

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here