Home राष्ट्रीय राहुल गांधी आईवर गेले, ते पंतप्रधान होऊ शकणार नाही! -जय पी सिंह

राहुल गांधी आईवर गेले, ते पंतप्रधान होऊ शकणार नाही! -जय पी सिंह

राहुल गांधी आईवर गेले, ते पंतप्रधान होऊ शकणार नाही! – जय पी सिंह

काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाहिलं जात आहे. त्यामुळे बऱ्याचदा भाजप समर्थक  राहुल गांधी यांची खिल्ली उडवतात व  त्यांच्यावर टीका करतात. आता मात्र  बहुजन समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक जय पी सिंह यांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी आईवर गेल्यामुळे ते पंतप्रधान बनू शकत नाहीत, कारण, सोनिया गांधी या परदेशी आहेत, असं वादग्रस्त टीका सिंह यांनी केली आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, जयप्रकाश सिंह राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हणाले की, राहुल गांधी हे त्यांचे पिता राजीव यांच्यापेक्षा त्यांची आई सोनिया गांधींसारखे दिसतात. त्यांची आई विदेशी वंशाची आहे. त्यामुळे राहुल कधीच पंतप्रधान बनू शकत नाहीत. त्यापेक्षा मायावती यांना निवडून द्यावं. कारण त्या दलित नेत्यापासून सर्व समाजाच्या नेत्या बनल्या आहेत. उत्तर प्रदेशसारख्या राज्याच्या त्या चार वेळा मुख्यमंत्री होत्या, असंही सिंह यावेळी म्हणाले.

जेव्हा ही बातमी सर्वत्र पसरली तेव्हा बसपा प्रमुख मायावती यांनी राष्ट्रीय समन्वयक पदावरून जयप्रकाश सिंह यांना हटवलं आहे. मायावती यांच्या म्हणण्यानुसार, सिंह यांनी पक्षाच्या धोरणाव्यतिरिक्त सार्वजनिक मंचावरून अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ या पदावरून हटवण्यात येत आहे.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here