Home अहमदनगर Murder: माहेरी जाण्याच्या वादातून पतीने पत्नीस ठार मारले

Murder: माहेरी जाण्याच्या वादातून पतीने पत्नीस ठार मारले

Rahuri Husband murder wife over argument

राहुरी | Murder: माहेरी जाण्याच्या वादातून नवऱ्याने बायकोला दगड व हत्याराने ठार मारल्याची घटना राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे १६ ते १९ ऑगस्ट दरम्यान असून गुरुवारी सकाळी उघड झाली आहे.

अलका वसंत शिंदे असे या मयत महिलेचे नाव आहे. तिचा पती आरोपीस अटक करण्यात आली आहे.

राहुरी तालुक्यातील गुंजाळे गावाच्या तलावाजवळ १६ ते १९ ऑगस्ट दरम्यान खून होऊन गुरुवारी सकाळी ही उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर विभागाचे उप अधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपी वसंत लक्षमण शिंदे वय ५५ यास गावापासून जवळ असलेल्या डोंगरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

मयत महिलेच्या मुलगी बाली काळू निकम हिने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हंटले आहे की, गुंजाळे शिवारातील तलावाजवळ झोपडीत माझ्या आई वडिलांचे वास्तव्य होते. आई श्रीगोंदे येथे माहेरी जाण्याचे म्हंटल्याने वडिलांनी नकार दिला. या दोघांत भांडण होऊन मारहाण करण्यात आली. त्यातच तिचा मृत्यू झाला.

येथे पहा: हार्दिक पांड्या टॉप सिक्सेस, हेलिकॉप्टर शॉट 6666

चौथ्या दिवशी वसंत शिंदे याने मुलीला भेटून तुझी आई उठत नाही ही माहिती दिल्याने मुलगी घटनास्थळी दाखल झाली. मात्र आईचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. चार दिवसाचा कालावधी झाल्याने मृतदेह खराब झाला होता. मृतदेहाचा जागेवर शवविचेदन करण्यात आला असून नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक तुषार धाकराव हे करीत आहे.

Web Title: Rahuri Husband murder wife over argument

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here