राहुरी: वाहनांच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार
वाहनांच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार
राहुरी : – नगर -मनमाड मार्गावरील हॉटेल सर्जाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. मयत दोघे राहुरी करखाना येथील तरुण असल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
You May Also Like: Salman Khan upcoming movies 2018 and 2019
योगेश आबासाहेब गावांदे (वय २८ , रा. कराळेवाडी, राहुरी फॅक्टरी) व पांडुरंग भागवत तुपे (वय २७, रा. अंबिकानगर , राहुरी फॅक्टरी) हे एका दुचाकीवरुन जात असतांना पाठीमागुन आलेल्या वाहनाने या दोघांना उडवले. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यु झाला. गुरुवारी दुपारी राहुरी येथे शवविच्छेदन केंद्रावर जमलेल्या नातेवाईकांनी दोघा तरुणांचे मृतदेह पाहुन हंबरडा फोडला. मयत येगेश हा चैतन्य मिलचे डीलर यशवंत फोफसे यांच्या दुध वाहक वाहनावर चालक म्हणुन काम करत होता. दरम्यान पांडुरंग तुपे याच्या वर दुपारी २ वाजता तर सायंकाळी ४ वाजता योगेश गवांदे याच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघात समयी दीपक त्रिभुन , सुनील सोनवणे , हर्षद ताथेड, योगेश आंबेडकर , शांती चौक मित्रमंडळ सदस्य व कराळेवाडी परिसरातील नागरीकांनी मदत केली.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.