संगमनेर: सत्यजीत तांबे युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी- मोठया मताने विजयी
सत्यजीत तांबे युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी
संगमनेर: – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष युवा नेते सत्यजीत तांबे यांची मोठया मताने निवड झाली आहे. या निवडीनंतर अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.
You May Also Like: Salman Khan upcoming movies 2018 and 2019
कॉग्रसचे अध्यक्ष खा.राहुल गांधी यांनी युवकांना लोकशाहीत व पक्षसंघटनेत अधिकाधिक सक्रिय होण्यासाठी प्रत्येक राज्यात युवक काँग्रेसची निवडणुक केली. यामध्ये महाराष्ट्र राज्यातुन मोठया प्रमाणात युवकांची नोंदणी झाली. यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी सत्यजीत तांबे, अमित झानक यांचे सह कुणाल राऊत या निवडणुक रिंगणात होते. सत्यजीत तांबे हे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य काँग्रसचे नेते आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदशाखाली मागील २० वर्षापासुन काँग्रेस पक्षसंघटनेत सक्रिय आहेत. त्यांनी एनएसयुआय चे प्रदेश उपाध्यक्ष ,जि. प. सदस्य त्याच बरोबर मागील ५ वर्ष राज्याचे युवक उपाध्यक्षपद सक्षमपणे सांभाळले. राज्यभर युवकांनी सोबत घेवुन काम करणारे सत्यजीत तांबे हे राज्यातील अभ्यासु, धाडसी तसेच विविध भाषांवर प्रभुत्व मिळवणारे युवा नेता म्हणुन सर्वत्र ओळखले जातात. पक्षाध्यक्ष खा. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणुन काम करतांना त्यांनी वेळोवेळी पक्षाच्या भुमिका कणखरणपणे मांडल्या आहेत. युथ ते राष्ट्रीय स्तरावरील काम करतांना त्यांनी तळागाळातील युवकांना न्याय दिला.
त्यांनी नेहरु युवा केंद्र , जयहिंद युवा मंच, क्रिकेट असोसिएशन , सांस्कृतिक मंच अशा विविध माध्यमातुन त्यांनी सातत्याने समाजकारणात निवड ही एक औपचारिकता राहिली होती. राज्याचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे , प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , माजीमंत्री आ. बाळासहेब थोरात , विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे, हर्षवर्धन पाटील, सत्यजीत पाटील, आमदार विश्वजीत कदम, नितीन राऊत, माणिकराव ठाकरे, ख. राजीव सातव यांसह राज्यातील सर्व वरिष्ट नेत्यांनी एकमताने सत्यजीत तांबे यांना पाठिंबा दिला होता. आज नागपुर येथे युवक काँग्रेसच्या निवडीचा निकाल होता. यामध्ये सत्यजीत तांबे हे ३७१९० या मोठया मताने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवडुन आले. त्यांचे निवडीचे आतीश बाजी करण्यात आली. गुलालाची उधळण करत युवकांनी एकच जल्लोष केला. जिल्ह्यात ही युवकांनी मोठा जल्लोष केला.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.