Home अहमदनगर वाळू तस्कराची महिला सरपंच, तलाठी, पोलीस पाटील यांना शिवीगाळ व दमबाजी

वाळू तस्कराची महिला सरपंच, तलाठी, पोलीस पाटील यांना शिवीगाळ व दमबाजी

Rahuri Women Sarpanch, Talathi, Police Patil of sand smuggling were insulted 

राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यात मुळा व प्रवरा नदीपात्रातून महसूल व पोलिसांच्या आशिर्वादाने वाळू तस्करी जोमात चालू आहे. तालुक्यातील पाथरे खुर्द येथे प्रवरा नदीपात्रातून खुलेआम वाळू तस्करी सुरू असताना ग्रामस्थांनी ती रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव करून नदीपात्रात तयार केलेले रस्ते खोदून ठेवले.  मात्र एका  वाळू तस्कराने पुन्हा रस्ता तयार केला आहे. खुलेआम तस्करी सुरु आहे.

संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊन वाळू तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर वाळू तस्कराने महिला सरपंचांसह सर्वांना शिवीगाळ करून दमदाटी केली आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

दरम्यान, बेकायदेशीर वाळू तस्करी रोखण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या महिला सरपंचांसह तलाठी, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील यांना दमदाटी करून शिवीगाळ केली. याप्रकरणी महिला सरपंचांसह सर्वांनीच राहुरी येथे तहसील कार्यालयात धाव घेत वाळू तस्करांवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे. पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

Web Title: Rahuri Women Sarpanch, Talathi, Police Patil of sand smuggling were insulted 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here