Home अहमदनगर Murder: पत्नीचा खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या

Murder: पत्नीचा खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या

Wife murder and Husband commits suicide by strangling 

शेवगाव | Murder: दारूच्या नशेत पत्नीचा खून करून पतीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील खरडगावातील आरोग्य केंद्रशेजारील वस्तीवर घडली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

लताबाई दशरथ दळे वय ४५, दशरथ मन्साराम दळे वय ५० दोघेही रा. खरडगाव ता. शेवगाव अशी मयतांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, दशरथ दळे याने गुरुवारी रात्री पत्नी लताबाई हिच्या डोक्यात लाकूड घालून खून केला त्यानंतर त्याने घरापासून काही अंतरावर असलेल्या एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री बाहेर गेलेला मुलगा शुक्रवारी सकाळी घरी आल्यावर त्याला आईचा मृतदेह आढळून आला. त्याने वडिलांचा शोध घेतला तर त्यांचा मृतदेह घरापासून जवळच असलेल्या एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. हा सर्व प्रकार पाहून घाबरलेल्या मुलाने शेवगाव पोलिसांना माहिती दिली. पोलीसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

दारूच्या नशेत पतीने पत्नीचा खून करून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने असे कृत्य का केले याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत शेवगाव पोलीस अधिक तपास करीत आहे.   

Web Title: Wife murder and Husband commits suicide by strangling 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here