Home अहमदनगर रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरून राम शिंदेनी रोहित पवारांवर साधला निशाणा

रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरून राम शिंदेनी रोहित पवारांवर साधला निशाणा

Ram Shinde targets Rohit Pawar over Ramdesivir

अहमदनगर: कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन बारामतीमध्ये सहजरित्या मिळते मात्र जामखेड मध्ये ते मिळत नाही. येथील रुग्णांची हेळसांड होण्यास राज्यसरकारच जबाबदार आहे असा आरोप भाजपचे माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी केला आहे.

बारामतीच्या तुलनेत जामखेडला कमी लक्ष दिले जाते असा उल्लेख करून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ग्रामीण रुग्णालय आणि केंद्र व राज्य सरकारच्या मदतीवर चालणाऱ्या डॉ. आरोळे कोविड केअर सेंटरच्या बाहेर एकट्या आमदाराचे फोटो कसे? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे,

राम शिंदे यांनी कर्जत जामखेड मधील कोरोनाचा आढावा घेतला ठिकठिकाणी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले या मतदारसंघातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. बऱ्याच हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक आहे. मात्र ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ते इंजेक्शन बारामतीत मिळते मग जामखेडमध्ये का मिळत नाही? ते इंजेक्शन नसल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या स्थितीला लोकप्रतिनिधी व राज्यसरकारच जबाबदार आहे.

डॉ. आरोळे वर्षभरापासून या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून सेवा देत आहेत. त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मदत केली जाते. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपला स्वत:चा फोटो असलेला फ्लेक्स या सेंटरबाहेर लावला आहे. या सेंटरला जर सरकारची मदत मिळत असेल तर तेथे पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेही फोटो हवे होते. मात्र, येथील लोकप्रतिनिधी प्रसिद्धीसाठी हापापलेले असल्याने त्यांना याचे भान राहिले नाही. स्वत:चा फोटो लावायचा होता तर जामखेडला स्वतः खर्चाने कोविड केअर सेंटर उभे करायचे होते, असा टोलाही शिंदे यांनी पवार यांचे नाव न घेता लगावला.

Web Title: Ram Shinde targets Rohit Pawar over Ramdesivir

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here