Home क्राईम धक्कादायक! चाकूचा धाक दाखवून कापूस वेचणाऱ्या महिलेवर बलात्कार

धक्कादायक! चाकूचा धाक दाखवून कापूस वेचणाऱ्या महिलेवर बलात्कार

Jalana Crime News: पिडीत महिलेला जीवे मारण्याची धमकी देत दोन वेळा बलात्कार (rape), आरोपी वकिलाविरोधात गुन्हा दाखल.

Rape of a woman picking cotton at the threat of a knife

जालना: शेतामध्ये कापूस वेचणाऱ्या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातल्या परतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आरोपीने पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देत दोन वेळा बलात्कार केला. या घटनेप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी वकिलाविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, परतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेतामध्ये ही घटना घडली. 26 वर्षीय महिला आपल्या शेतामध्ये एकटीच कापूस वेचत होती. महिलेला शेतामध्ये एकटी पाहून संशयित आरोपी वकील दासू आढे त्याठिकाणी आला. आरोपीने पीडित महिलेकडे पिण्यासाठी पाणी मागितले. महिलेने त्याला पाणी दिले आणि ती पुन्हा कापूस वेचण्याच्या कामाला लागली. त्यानंतर आरोपीने संधीचा फायदा घेत महिलेचा जबरदस्ती हात पकडला.

यावेळी पीडित महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला पण शेतामध्ये कोणीच नसल्यामुळे तिच्या मदतीला कोणीच येऊ शकले नाही. यावेळी संशयित आरोपीने महिलेच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला कापून टाकण्याची धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला. ऐवढ्यावर न थांबता याविषयी कोणाला सांगतले तर जीवे मारुन टाकेल अशी धमकी आरोपीने पीडित महिलेला दिली.

घाबरलेल्या पीडित महिलेने आपली बदनामी होईल या भीतीने कुणालाही या घटनेविषयी सांगितले नाही. याचाच फायदा घेत आरोपी १ एप्रिलला दुपारी पुन्हा शेतावर आला. आरोपीला पाहून महिला घाबरली. आरोपीने पुन्हा चाकूचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार केला. घाबरलेल्या महिलेने घरी आल्यानंतर तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर महिलेने तात्काळ परतूर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पीडित महिलेने संशयित आरोपी वकील दासू आढेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी परतूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Rape of a woman picking cotton at the threat of a knife

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here