Home नाशिक टायर फुटला आणि शिवशाही बस पेटली;  Shivshahi Bus Fire

टायर फुटला आणि शिवशाही बस पेटली;  Shivshahi Bus Fire

Shivshahi Bus Fire : नाशिकमध्ये शिवशाही बसचा टायर फुटून बस पेटल्याची घटना.

Shivshahi Bus Fire at Nashik

नाशिक :  नाशिकमध्ये शिवशाही बसचा टायर फुटून बस पेटल्याची घटना घडली आहे. तातडीने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. बस मधील बिघाडाबाबत ड्रायव्हरच्या आधीच लक्षात आले होते. यामुळे त्याने घेतलेल्या एका निर्णयामुळे प्रवासी बचावले आहेत. एसटी महामंडळाच्या बसेसना वारंवार अपघात होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत आहे.    

नाशिकच्या मुंबई नाका बस स्थानक परिसरात शिवशाही बसला आग लागली. टायर फुटल्याने बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  नाशिक माजीवाडा बोरिवली (बस क्रमांक – एमएच 06 बी डब्ल्यू 11 87)  या बसला आग लागली. अचानक आग लागल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

बस स्थानकात येताच बसच्या टायरचा स्फोट झाला. यामुळे बसला आग लागली. बस चलाकाने वेळीच धोका लक्षात घेत प्रवाशांची दुसऱ्या बसमध्ये व्यवस्था केली. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.

ही बस नाशिकच्या मुंबई नाका बस स्थानकात कडून मुंबईतील बोरिवलीच्या दिशेने रवाना झाली होती. बस चालकाला गरवारे पॉईंट जवळ बस मध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. बस चालकाने तात्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांची दुसऱ्या बसमध्ये व्यवस्था केली. यानंतर ड्रायव्हरने बस  मुंबई नाका स्थानकात आणली होती.घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाचे कर्मचारी, एक बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

Web Title: Shivshahi Bus Fire at Nashik

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here