Russia-Ukraine crisis: नगरमधील 18 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; पालक चिंतेत
अहमदनगर | Ahmednagar: रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine crisis) युद्ध सुरु आहे. या युद्धात दोन्ही बाजूचे मोठे नुकसानही झालं आहे. मात्र या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्या राज्यातील मुले अडकली आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी अडकले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना चिंता लागून राहिली आहे.
अहमदनगरच्या एड्युकॉन एज्युकेशनल कन्सल्टन्सी संस्थेचे डॉक्टर महेंद्र झावरे पाटील यांच्या मार्फत 40 विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेले आहेत यापैकी जवळपास 16 ते 18 विद्यार्थी अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील आहेत.
त्यामुळे रशिया युक्रेन युद्धाचा फटका अडकलेल्या शालेय विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांकडून भारत सरकारला फ्लाइट ने मायदेशात आणण्याची विनंती करण्यात आली आहे.
विद्यार्थी अडकले असतानाच दुसरीकडे मात्र या विद्यार्थ्यांकडे पैसेही असताना ATM बाहेर पैशासाठी लांबच लांब रांगा लागल्याने पैसे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं तिथं अडकलेल्या साक्षी बोराटे हिने सांगितलं आहे.
Web Title: Russia-Ukraine crisis Ahmednagar Student effect