Home Accident News पुणे नाशिक महामार्गावर अननस घेऊन जाणाऱ्या ट्रकची कंटेनरला धडक

पुणे नाशिक महामार्गावर अननस घेऊन जाणाऱ्या ट्रकची कंटेनरला धडक

Sangamner dolasane area truck container Accident

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील डोळासने शिवारात बाबळेवाडी येथे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अननस घेऊन जाणाऱ्या ट्रकने कंटेनरला मागील बाजूने जोराची धडक दिल्याने वाहनासह कंटेनरमधील चार नवीन कारचे नुकसान झाले. सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारस हा अपघात घडला.

ट्रक चालक हा ट्रकमधून केरळ राज्यातून अननस घेऊन नाशिकला चालला होता. सोमवारी पहाटे हा ट्रक डोळासने शिवारात बाबळेवाडी येथे आला असता महामार्गाच्या कडेला कंटेनर टायराचा पंचर काढण्यासाठी थांबलेला होता. या ट्रकने मागील बाजूने कंटेनरला जोराची धडक दिली. यामध्ये ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे. महामार्गाच्या बाजूला अननस पडले होते. कंटेनर मधील नाविन चार कारचे या अपघातात नुकसान झाले आहे. ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टोलनाक्याच्या कर्मचारी यांनी वाहने क्रेनच्या सहायाने बाजूला घेतले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner dolasane area truck container Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here