संगमनेर: शेतकर्यांनी केला मुंबईचा दुध पुरवठा बंद
संगमनेर: शेतकर्यांनी केला मुंबईचा दुध पुरवठा बंद
संगमनेर: सरकारने दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दुध आंदोलनाला राज्यातील इतर शेतकरी व विविध संघटनांनी पाठींबा दिला. मुंबईला जाणारा सर्व दुध पुरवठा रोखण्यात आला. ठिकठिकाणी दुध उत्पादक शेतकर्यांनी दुधाचे टॅकर अडवून , दुध रस्त्यावर ओतून, फुकट वाटून शासनाचा निषेध केला. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले.
You Might Also Like: Shraddha Kapoor Upcoming Movies With Release Date
स्वाभिमानी शेतकरी संघटनेन पुकारलेल्या दुध बंद आंदोलनाचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी टॅकर अडवून तोडफोड केली आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावर दुध ओतले आहे. दुसरीकडे सरकारने दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीवर शेट्टी ठाम आहेत. खर तर आम्हालाही आंदोलन करायचे नाही पण सरकारने आज विधिमंडळात दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान घोषित करावे, त्यानंतरच आम्ही आंदोलन मागे घेऊ असे शेट्टी यांनी सांगितले.
You Might Also Like: Rajinikanth and Akshay Kumar’s 2.0
दरम्यान सरकारच्या कथनी आणि करणीत फरक असल्यामुळे दुध आंदोलन पेटले असून या आंदोलनाला कॉंग्रेसचा पूर्ण पाठींबा आहे. सरकारने बळाचा वापर करून दुध उत्पादकाचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करू नये,किंवा तशी धमकीही देऊ नये. राज्यात शेतकर्यांवर दडपशाही झाली तर त्याची जबर किमत सरकारला मोजावी लागेल. हे सरकारने ध्यानात ठेवावे. असा इशारा विधानसभेतील विरोधी पाक्स नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
संगमनेर व अकोले तालुक्यातील दुध संघांनी दुध संघ बंद ठेऊन संपाला पाठींबा दिला आहे. तर संतप्त शेतकर्यांनी ठिकठिकाणी रस्त्य्यावर दुध ओतले तर गरीब कुटुंबाना दुध मोफत वाटण्यात आले.दरम्यान या आंदोलनाला किसान सभेने पाठींबा दिला. पोलिसांनी अजित नवले सह अनेक शेतकरी नेत्यांची धरपकड केली. राज्यात दुध आंदोलन चांगलेच पेटले आहे.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.