Home Accident News संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर टायर फुटल्याने ट्रक उलटला

संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर टायर फुटल्याने ट्रक उलटला

Sangamner nashik pune Highway truck Accident 

संगमनेर | Accident: मल्चिंग पेपर घेऊन जाणारा ट्रक टायर फुटल्याने उलटल्याची घटना नाशिक पुणे महार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकमधील मालाचे नुकसान झाले आहे.

नाशिकहून साताऱ्याला मल्चिंग पेपर घेऊन जाणारा आयशर कंपनीचा ट्रक संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात पहाटे तीन वाजेच्या सुमारास आला असता पुढील टायर फुटल्याने चालक सुनील शिंदे यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक सर्विस रस्त्यावर पलटी झाला. या परिसरात नेहमीच वर्दळ असते. पहाटेच्या सुमारास अपघात घडल्याने मोठी हानी टळली. वाहतूक विस्कळीत झाली होती. ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Sangamner nashik pune Highway truck Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here