Home क्राईम बैल पोळ्याच्या दिवशीच बैल जोडी चोरीस, संगमनेर तालुक्यातील घटना

बैल पोळ्याच्या दिवशीच बैल जोडी चोरीस, संगमनेर तालुक्यातील घटना

Sangamner News bull pair stole

संगमनेर | Sangamner News: संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथील एका शेतकऱ्याची बैल जोडी दोन भामट्यांनी पोळा सणाच्या दिवशीच चोरून नेल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. बाळू मारुती कोळेकर व बाळासाहेब पांडुरंग फड असे या दोघांचे नावे आहेत. या चोरट्यांनी या शेतकऱ्याच्या घरापासून दोन बैलांची चोरी केली. डिग्रसमार्गे ही बैल जोडी यांनी संगमनेर तालुक्यातील निंबाळे एका कसायाला विक्री करताना आढळून आले. बैल मालक व नातेवाईक या बैलांचा शोध घेत होते.

दरम्यान दोन चोरटे निंबाळेजवळ बैल घेऊन जात असताना दिसले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी त्या दोघांना चांगलाच चोप दिला. या घटनेची माहिती संगमनेर शहर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ तळेकर व साईनाथ पवार यांना घटनास्थळी पाठविले. त्यांनी या दोन भामट्याना ताब्यात घेतले. बैल पोळीच्या दिवशीच बैल चोरण्याचे महापाप केले परंतु त्यांचा डाव अपयशी ठरला. अखेर ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

या दोघांविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल कैलास देशमुख हे करीत आहे.

Web Title:  Sangamner News bull pair stole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here