Home संगमनेर संगमनेर: चालत्या कारला आग

संगमनेर: चालत्या कारला आग

संगमनेर: चालत्या कारला आग

तळेगाव दिघे: संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे वडझरी बु. शिवारात दिघे लोणी चाललेल्या कारने पेट घेतल्याने कार काही क्षणात जळून खाक झाल्याची घटना शनिवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु अंदाजे यात पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

तळेगाव दिघे लोणी रस्त्याने कारमधून (एम.एच.१६क्यू ९९३५) विजय भागवत बनकर व चालक सतीश बाबुराव विदुर हे दोघे जण लोणीच्या दिशेने प्रवास करी असताना वडझरी बु. शिवारात कारने अचानक पेट घेतल्याने काही क्षणातच कार आगीच्या भक्ष्यस्थानी स्थानी पडली. विजय भागवत बनकर व चालक सतीश बाबुराव विदुर यांनी कारमधून बाहेर उडी मारत बाहेर पडल्याने ते दोघेही बचावले. कारला आग लागल्याचे अन्य वाहकाने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी स्थळी जाऊन स्थानिक रहिवासी च्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. गाडीला कशामुळे आग लागली याचे मात्र कारण समजू शकले नाही. असे तळेगाव पोलीस हवालदार बाबा खेडकर यांनी सांगितले.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here