Home संगमनेर संगमनेर: चोरट्यांचा धुमाकूळ ज्वेलरी शॉप आणि घरांमध्ये मोठा डल्ला

संगमनेर: चोरट्यांचा धुमाकूळ ज्वेलरी शॉप आणि घरांमध्ये मोठा डल्ला

संगमनेर: चोरट्यांचा धुमाकूळ ज्वेलरी शॉप आणि घरांमध्ये मोठा डल्ला

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथे चोरट्यांनी सुवर्णकारच्या दुकानासह पाच घरांवर डल्ला मारला. रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची हि घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

पेमगिरी रोड येथील महाले ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान चोरट्यांनी फोडून चांदी व किरकोळ रक्कम चोरून नेत दोन ते तीन हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला व चोरट्यांनी गावातील अनिल चंद्रभान बागडे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील चांदीच्या बांगड्या व अंदाजे तीन हजार रुपये चोरून नेले. सचिन शिंदे यांच्या घराचे कुलूप तोडून येथूनही किरकोळ रक्कम चोरून नेली. निमगाव खुर्द येथील छगन महाराज खंडके यांच्या घराकडे मोर्चा वळवत त्यांच्या घराचे कुलूप तोडून सुमारे १९ हजार रुपये रोख व दोन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. घटनेची माहिती मिळताच निमगावाचे पोलीस पाटील राजेंद्र कानवडे यांनी संगमनेर तालुका पोलिसांना खबर दिली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सहाणे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान बुधवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

Website Title: sangamner news Thieves Jewelry Shop and Big Ducks in the House


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here